संस्थेची माहिती

कृषि उत्पन्न बाजार समिती, घोटी

प्रस्तावना

बाजार समितीचा स्थापना नं. PMA- 7055 सेक्शन -5 बॉम्बे ॲग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी ॲक्ट 1939 मुंबई शासनाचे आदेशाने 1 ऑगस्ट 1955 रोजी झालेली असुन नाशिक जिल्हातील डोंगराळ व दुर्गम आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील 103 गावांचा बाजार समितीच्या कार्यश्रेत्रात समावेश होतो बाजार समिती चे मुख्य बाजार आवार हे तालुक्याच्या भौगोलिक दुष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या घोटी बु. बाजार पेठेच्या गावात आहे. इगतपुरी तालुका दूर्गम व डोंगराळ तसेच आदिवासी बहुल लोकसंख्या जास्त असल्याने महाराष्ट शासनाने सन 1972 पासुन आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतमाल खरेदेची योजना सुरु केलेली असुन धान, वरई, नागली इ.शेतमालाची खरेदी आदिवासी विकास महामंडाळामार्फत होत असते त्यामुळे मख्य बाजार आवारावर धान्य व भुसार शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही. पंरतु इगतपुरी तालुक्यामध्ये अति पर्जन्यंवष्टी होत असल्याने, तालुक्यामध्ये 9 लहान मोठी धरण आहेत. सदर धरणामुळे इगतपुरी तालुक्यातील बहुतांश जमिन हि सिंचना खाली आल्याने बाजार समितीचे कार्यश्रत्रामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळभाज्या या नगदी पिकांचे उत्नादन होवुन बाजार समितीचे मुख्य बाजार आवारावर माहे डीसेम्बंर ते जुन या कालावधी मध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेतमालाचर आवक होत असते. सदर भाजीपाला मुंबई, पुणे, नाशिक व गुजरात राज्यामध्ये पुरवठा होत असतो तसेच नाशिेक जिल्ह्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील पहाडी भुभागामध्ये डांगी बैल, गाय या पशुधनांची पैदास होत असुन सदर डांगी पशुधन बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर दर शनिवार खरेदी विक्रीसाठी गुरांचा बाजार कार्यान्वित आहे.


बाजार समितीचे वैशिष्ट्ये

  • पटाव पध्दतीने शेतमालाची विक्री. (आडतमुक्त)
  • शेतकऱ्याना रोखीने त्याच दिवशी मालाले पैसे आदा केले जातात.
  • बाजार समितीचे कार्यक्षेत्रात पिकविला जाणारा इंद्रायणी तांदळ जिल्हयासह महाराष्ट्रात घोटीचा इंद्रायणी म्हणून प्रसिद्ध.
  • बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे पेमेंट थकबाकीची आजपर्यंत तकार नाही.
  • बाजार समितीचा जनावरे आठवडे बाजार डांगी जनावरांकरिता जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रसिध्द.
  • मुंबई व उपनगरे जवळ असल्याने हिवाळी व उन्हाळी हंगामामध्ये ताजा व स्वच्छ भाजीपाला पुरविठा होतो.