कृषि उत्पन्न बाजार समिती, घोटी मध्ये आपले स्वागत आहे
बाजार समितीचा स्थापना नं. PMA- 7055 सेक्शन -5 बॉम्बे ॲग्रीकल्चर प्रोड्युस मार्केट कमिटी ॲक्ट 1939 मुंबई शासनाचे आदेशाने 1 ऑगस्ट 1955 रोजी झालेली असुन नाशिक जिल्हातील डोंगराळ व दुर्गम आदिवासी बहुल इगतपुरी तालुक्यातील 103 गावांचा बाजार समितीच्या कार्यश्रेत्रात समावेश होतो बाजार समिती चे मुख्य बाजार आवार हे तालुक्याच्या भौगोलिक दुष्ट्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या घोटी बु. बाजार पेठेच्या गावात आहे.
इगतपुरी तालुका दूर्गम व डोंगराळ तसेच आदिवासी बहुल लोकसंख्या जास्त असल्याने महाराष्ट शासनाने सन 1972 पासुन आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतमाल खरेदेची योजना सुरु केलेली असुन धान, वरई, नागली इ.शेतमालाची खरेदी आदिवासी विकास महामंडाळामार्फत होत असते त्यामुळे मख्य बाजार आवारावर धान्य व भुसार शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही.